कोणती फवारणी करावी

कोणती फवारणी करावी सर

1 Like

सोयबीन पिकात पिवळा मोसैकची लक्षणे दिसत आहे.
वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे नाहीतर संपूर्ण शेतात लक्षणे पसरू शकतात.

पांढरी माशी व रस शोषक किडी मार्फत या किडीचा प्रसार होतो.
नियंत्रणा वरील उपाय
रोग ग्रस्त झाडे काढून नष्ट करावे.
शेतात एकरी 20 ते 40 निळे चिकट सापळे प्रस्तापित करावे.
पांढरी माशी व रस शोषक कीड नियंत्रण करीता फ्लोनिकामाईड 50% (उलाला)@१० ग्रॅम किंवा टाटा मिडा @१० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पिकाच्या वाढीसाठी इसबिओन @४० मिली + सूक्ष्म अन्नद्रवे @२० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता.

1 Like

तणासाठी काय फवारावे

सोयबीन पिकासाठी तणनाशकाची शिफारस
Shaked (Adama) Propaquizafop 2.5%+ Imazethapyr 3.75% [800ml/acre]

2). Fusiflex (Syngenta) Fluazifop-p-butyl 13.4 %EC.[400ml/acre] (सोयाबीन + तुर असेल तर वापरु नये)

3)Odyssey (Basf) Imazamox 35 % + Imazethapyra 35 % WG [40 gm /acre]

4)Weed Block (Adama) Imazethapyr 10% SL.[400ml /acre]

  1. Pursuit (BASF) Imazethapyr 10% SL.[300ml /acre]

गवतवर्गीय तना साठी Weed Block व Pursuit सोबत.
1)Agil (Propaquizafop 10% EC),
2)Targa Super (Quizalofop Ethyl 5% EC) किंवा
3) Whip Super Fenoxaprop-p-ethyl 9 EC (9.3% w/w) [300ml /acre] वापरावे.

वरील तणनाशके स्वच्छ पाणी घेऊन वापरावे.