शेतात हिमानी आली दिसत आहे

हिमानी आली शेतात दिसत आहे, मार्गदर्शन मिळावे.

सोयबीन पिकावर किडीचा फारसे नुकसान होत नाही. झाल्यास सोयबीन सारख्या पिकात उपयोजना करणे कठीण जाते.
उपाययोजना
१) हुमणी अळी नियंत्रण करिता अंतर मशागती दरम्यान दिसणाऱ्या अळ्या वेचून नष्ट करावे.
२) हुमणी किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता मेटारायझिम अॅनिसोपिली @२ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या बुडाला आळवणी घालावी.
३) प्रादुर्भाव जास्त आढल्यास ५-६ दिवसाच्या अंतराने क्लोथोडीयन ५०% WG (डेंटासु ) @१०० ग्रॅम/ किंवा इमिडाक्लोप्रिड ४० % +फिप्रोनील ४० % (लेसेन्टा)@२०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून मिसळून पिकाच्या बुडाला आळवणी घालावी.