किड

ज्यास्त प्रमाणात किड आहे

वांगे पिकावर फळ व शेंडे पोखरणारी अळीचे प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.
या किडीचे केवळ एकात्मिक पद्धतीनेच नियंत्रण मिळते. कीटकनाशद्वारे तात्पुरते परिणाम पाहण्यास मिळतात.

एकात्मिक व्यवस्थापन

१) किडीचे नियमित निरीक्षण करून पिकातील प्रादुर्भावग्रस्त फांद्दी, फळे अळीसहित वेचून नष्ट करावी.
२) शेतात एकरी @ २० कामगंध सापळे प्रस्थापित करावे त्यामुळे नर पतंग पकडण्यास मदत मिळेल व पुढील प्रादुर्भाव टाळता येईल.
३) बॅसिलस थ्रुजेनेन्सिस (बीटी पावडर @ ३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) ) क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.३ %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@ १० मिली किंवा स्पिनोसॅड ४५% (ट्रेसर)@ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.