कापुस सल्ला

सर माझ्याकडे एक हेक्टर कापूस सात जून ची लागवड आहे ४५ दिवस पूर्ण झाले आहे जास्तीची पाते व रोग जाण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी फोटो अपलोड होत नाही

कापूस पीक सल्ला
१) लागवडीनंतर ५०व्या एकरी ३० किलो युरिया + ६० किलो पोटॅश + १० किलो कॅल्सियम याप्रमाणात मातीत मिसळून द्यावे.
२) शक्य असल्यास फवारणीमधून सूक्ष्म अन्नद्व्य्रे @३० ग्रॅम + ग्रोवर @४० मिली + ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
३) ढगाळ वातावरणात मावा व तुडतुडे किडीची संख्या मोठ्याप्रमाणत वाढून कोकडा रोगाचे प्रमाण वाढू शकते.
४) रसशोषक किडीच्या नियंत्रण करिता शेतात एकरी @३०-४० पिवळे चिकट सापळे प्रस्तापिथ करावे.
५) रसशोषक किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास ५/पान तर उलाला @१० ग्रॅम + इसबिओन @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
६) कापूस पिकात ५० -६० दिवसानंतर गुलाबी बोंड अळीचे लक्षणे दिसू शकतात त्या साठी नियमित सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.