मोसंबी फळ गळ

सर माझ्याकडे दोनशे झाडे मोसंबी आहे पण मोसंबीची गळ होत आहे त्याच्यासाठी काय उपाय आहे

मोसंबीवर ढगाळ वातावरणात विविध बुरशीची मोठय प्रमाणत वाढ होते.
संत्रा फळझाडांमध्ये बुरशीजन्य फळगळ प्रामुख्याने कोलेटोट्रीकम, डिप्लोडिआ, फायटोप्थोरा व ऑलटरनेरिया स होऊन फळांची साल व देठ यांचे जोडावर होऊन काळपट तपकिरी डाग पडतात व तो भाग कुजतो आणि फळांची गळ होते. झाडांवर जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर बुरशींचे बीजफळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतात, परिणामी आर्थिक नुकसानकारक फळगळ आढळून येते. यावेळेस बऱ्याच ठिकाणी फळगळ ही डिप्लोडिआ या बुरशीमुळे होतांना दिसत आहे.

उपाययोजना
बुरशीजन्य रोगापासून होणारी फळगळ व्यवस्थापना करिता खालील उपाययोजना कराव्यात-

  • सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी ती शेतात तसीच राहू देऊ नये अन्यथा या रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होऊन संक्रमण जलद गतीने होते. वाफा स्वछ ठेवावा.
  • . बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे कारण जिकडे पाणी साठून राहते त्या भागात फायटोफ्थोरा बुरशीची लागण अधिक होते.
  • फायटोफ्थोरा फळावरील तपकिरी रॉट मुळे होणाऱ्या फळगळ साठी संपूर्ण झाडावर फोसिटिल एएल २.५ ग्रॅम किवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्लूपी २.५ ग्रॅम किंवा कॅप्टन ७५ डब्लूपी २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
  • कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट मुळे होणाऱ्या फळगळसाठी बोर्डेक्स ०.६ टक्के मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्लूपी २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम ५० डब्लूपी १ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
  • फळावरील कूज असल्यास याकरिता बेंझिमिडाझोल या वर्गातील बुरशीनाशके यांची फवारणी करावी.