तूर उबाळणे/वाळणे

तूरीचे पीक कशामुळे वाळते/उबाळते आणि तूर वाळू नये या साठी काय उपाय करावा

  • रोगाचा प्राथमिक प्रसार जमिनीतील उपलब्ध असलेल्या फ्युसारीयम उडम व संक्रमित बियाणे मार्फत होते.
  • तसेच दुय्यम प्रसार सिंचनाद्वारे व अवजारांमार्फत होतो. मररोग नुकसान कारक बुरशीचे बिजाणू (स्पोर) जमिनीत ८-१८ वर्षा पर्यंत जिवंत राहू शकतात.

*प्रतिबंधक उपाययोजना:

  • रोग प्रतिकारक्षम असलेल्या वाणांची पेरणी करावी. जसे कि बी.एस.एम.आर-८५३, ७३६, विपुला, पिकेव्ही तारा, बिडीएन-७११, आयसीपीएल-८७ अशा वाणांची लागवडीसाठी निवड करावी.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डेझिम ५०% डब्लूपी @३ ग्रॅम व नंतर ट्रायकोड्रामा व्हीरीडी @५ ग्रॅम /किलो याप्रमाणात घेऊन बीजप्रक्रिया करावी.
  • पिकांची फेरपालट करावी.
  • तूर पिकात अंतरपीक म्हणून ज्वारी, बाजरी व मका पिकाची लागवड करावी. (प्रतिबंधक उपाययोजनांची कालावधी निघून गेलेला आहे, वरील संपूर्ण माहिती केवळ शेतकऱ्यांच्या सोयीसाठी देण्यात आलेली आहे).

उपचारत्मक उपयोजना:

  • बियाणे निवड, बीजप्रक्रिया व पिकांची फेरपालटची अवस्था निघून गेलेली आहे.
  • प्रादुर्भाव ग्रस्त झाडे लक्षणे दिसताच काढून नष्ट करावी त्यामुळे रोगाचा प्रसार कमी करण्यास मदत होईल
  • ट्रायकोड्रामा व्हीरीडी @२ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून प्रति झाड @१०० मिली याप्रमाणात आळवणी घालावी.
  • अंतरप्रवाही बुरशीनाशक जसे कि, कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5% DS (विटावॅक्स पॉवर) किंवा प्रोपीकोनॅझोल २५% (टील्ट)@३०० मिली किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% (ब्लू कॉपर, बिल्टॉक्स) @ ५०० ग्रॅम सोबत ह्युमिक अॅसिड @१ ली./२०० लिटर पाण्यात मिसळून प्रति झाड/१०० मिली या प्रमाणात घेऊन बुडाशी आळवणी घालावी.
  • ज्या जमिनीत पावसाचे पाणी धरून ठेवण्याची किंवा साचून राहत असले त्या जमिनीत पीक वाढीच्या कालावधी पासून ते फुलोरा पर्यंत वरीलप्रमाणे दोन वेळा नियोजन करावे.