मिरची ला फुल लागण्यासाठी कोणते खत वापरावे

मिरची ला फुल लागण्यासाठी कोणते खत वापरावे

मिरचीला फुले रोपे लागवाडीनंतर ३०-३५ दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते.
मिरची पिकात एकात्मिक कीड व अन्नद्रव्ये व्यवस्थापन केल्यास फुलांचे प्रमाण वाढू शकते.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन
१) पीक २५ ते ३५ दिवस अवस्थेत असताना मायकोरायझा @५०० ग्रॅम + पीएसपी ५०० ग्रॅम /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे १० गुंठे क्षेत्रासाठी सोडावे.
२) वरीलप्रमाणे नियोजन केल्यानतर १९:१९:१९ विद्र्वाये खत @२.५ किलो/१०० पाण्यात मिसळून ठिबकद्वारे १० गुंठे क्षेत्रासाठी सोडावे.
३) फवारणीद्वारे शुक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम + बायोविटा @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) भरखते म्हणून calcium ammonium nitrate@ २० किलो/१० गुंठे क्षेत्रासाठी मातीत मिसळून द्यावे.
५) अधून मधून ७-८ दिवसाच्या अंतराने १३:४०:१३ @२.५ किलो/१०० पाण्यात मिसळून ठिबकद्वारे १० गुंठे क्षेत्रासाठी सोडावे.
६)वेळोवेळी सर्वेक्षण करून कीड नियंत्रणाचे सर्व पर्यायाचा अवलंब करावा.