लिंबू लागवड

हे झाड कशामुळे वाळून गेले आहे.

उन्हाळ्यात पाण्याच्या दीर्घकालीन ताण बसल्याने झाडांना शॉक बसतो ते एक कारण असू शकते. वाळलेल्या फांद्याची वेळेवर छाटणी न करणे यामुळे वाळलेल्या फांद्याचे प्रमाण वाढल आहे.

उपाययोजना:
१) पावसाळयापूर्वी वाळलेल्या फांद्याची छाटणी करून बोर्डोपेस्ट लावावे त्यामुळे डिंक्या रोगाचे प्रमाण कमी करता येईल.
२) रोगग्रस्त झाडांच्या बुडाला फ़ोलिओ गोल्ड बुरशीची@५ मिली + ५ लिटर पाणी/ झाड या प्रमाणात घेऊन आळवणी घालावी.