कापुस सल्ला

सर माझी 7 जून ची लागवड आहे कापुस या पिकावर कोकडा व शेंडा वाढ होत नाही यासाठी काय फवारणी करावी

कापूस पिकावर प्राथमिक अवस्थेत तुडतुडे किडीचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

एकात्मिक व्यवस्थापन:
१) शेतात एकरी @२० -३० निळे- पिवळे चिकट सापळे प्रस्थापित करावे.
२) वर्टीसेलीअम लेकाणी @७० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (३ कीड/ पान) असेल तर शिफारशीत असलेले किटकनाशकाची फवारणी करावी.
४) किडीच्या नियंत्रण करिता थायमेंथॉक्झाम २५% @१० ग्रॅम + निंबोळी अर्क @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.