तूर

तूर उबाळू नये यासाठी काय उपाय योजना कराव्यात

तूर पीक फुलोरा अवस्थेत असताना मोठ्या प्रमाणात मर रोग किंवा मूळ कुज रोगाचे लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसतात.

उपयोजना
१) रोग प्रतिकारशक्ती असलेल्या वाणाची निवड करावी जसे कि बिडीएन-७११, बिडीएन-८५३, गोदावरी.
२) तूर लागवड करताना ट्रायकोड्रामा व्हीरीडी @५ ग्रॅम /किलो या प्रमाणात घेऊन बीजप्रक्रिया करावी.
३) ट्रायकोड्रामा व्हीरीडी जैविक बुरशी एकरी @ २ किलो + ५०० किलो कुजलेले शेणखत एकत्रित करून जमीन तयार करताना शेतात मिसळून द्यावे.