जवळपास दोडका हे पीक 15 दिवसाचे असून या वरती कुठली कीड आली आहे हे मला कळेना त्यामुळे बहुतेक रोप जळून चालली याचे याची मला माहिती व उपाय सुचवा
ईअरवीग (EARWIG) कीड आहे.
प्रमुख कीड नसून तुरळीक ठिकाणी आढळणारी आहे.
पिकाच्या भोवती काडीकचरा जास्त असल्यास त्या ठिकाणी आपली उपजीविका करते.
हि कीड निशाचर आहे पिकांना रात्रीच्यावेळी नुकसान करते.
उपाययोजना
१) रोपांच्या बुडाला ५० ग्रॅम निंबोळी पेंढ + चांगले कुजलेले शेणखत ५०० ग्रॅम/रोपे या प्रमाणत मिश्रण करून रोपांच्या बुडाला मातीत मिश्रण करून द्यावे.
२) मेटाऱ्हायझीयम अनीसोपीली @५० ग्रॅम + चांगले कुजलेले शेणखत ५०० ग्रॅम/रोपे या प्रमाणत मिश्रण करून रोपांच्या बुडाला मातीत मिश्रण करून द्यावे व नंतर हलक्या स्वरुपात पाणी व्यवस्थापन करावे.
३) वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर ५-७ दिवसांनी जर किडीचे प्रमाण वाढल्यास क्लोरोपायरीफॉस २०% EC @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून प्रति रोपे @२० मिली द्रावण घेऊन आळवणी घालावी.