मिरची

मिरची

1 Like

टूटा किडीचे लक्षणे वाटत आहे. टोमॅटो पिकावरील प्रमुख कीड आहे. परंतु आता मिरची पिकावरहि या किडीचा प्रकोप दिसतोय.

उपाययोजना
१) शेतात एकरी एक प्रकाश सापळ्यांचा वापर करावा तसेच कामगंध सापळे @२०/एकरी लावण्याची सोय करावी.
२) जैविक नियंत्रणात बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझिम अॅनिसोपिली@५० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) टूटा किडीचे पतंग प्रकाश सापल्याकडे मोठ्याप्रमाणत आकर्षित होते. त्याकरिता एकरी @१ प्रकाश सापळे प्रस्थापीथ करावे.
जर किडीच्या संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (१० % नुकसान )असेल तर खालील कोणत्याही एका कीटकनाशक ची फवारणी करावी.
१ ) क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपर मेथ्रीन ५ % EC (हमला, डबल स्टार ,कोरंडा ५०५ )@३० मिली
२ ) क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली
3) इमामेक्टीन बेनझोइट ५ %SG (स्टारक्लेम, प्रोक्लेम, मिसाईल )@५ ग्रॅम + क्लोरोपायरीफॉस २० % EC @३० मिली. किंवा डेलीगेट (स्पिनेटोरम 11.7% SC)@५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like