2 Likes
पाने खाणारी किडीची लक्षणे आहेत.
सुरुवातीच्या अवस्थेत कीड पानावर बारीक छिद्र करून पापुद्रा करते व नंतर खरडून खाते.
उपाययोजना
१) शेतात एकरी @१० कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
२) ठिबक द्वारे बिव्हेरिया बॅसियाना किंवा मेटारायझिम अॅनिसोपिली@२ लिटर /२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे. तसेच फवारणी मार्फत १०० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) पिकाच्या भोवती मका/ एरंडीची लागवड करावी त्यामुळे मुख्य पिकावरील प्रादुर्भाव टाळता येतो.
४) कीड नियंत्रण करिता एमामेक्टीन बेन्झोंएट ५% एसजी @१० ग्रॅम+ निंबोळी अर्क @३० मिली
/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५ ) क्लोरँट्रॅनीलीप्रोल १८.५ SC**( कोराजन )** @३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.