सीताफळ छाटणी

3 वर्षांची बाग धरण्यासाठी सीताफळ छाटणी कशी करावी आणि खत व पाणी नियोजन कसे करावे याविषयी सविस्तर माहिती मिळावी.

छाटणी व्यवस्थापन
बागेस तीन वर्ष झाले असल्यास मे- जून महिन्यात म्हणजे फुले येण्यापूर्वी एक महिना बागेची छाटणी करावी.
छाटणी करताना वाळलेल्या फांद्या, कीड व रोगग्रस्त असलेल्या फांद्या काढून नष्ट करावे.
खत व्यवस्थापन
१) ३-५ वर्षापुढील झाडांसाठी शेणखत ३५ किलो नत्र २४० ग्रॅम + स्फुरद २१७ ग्रॅम व पालाश १६७ ग्रॅम/ झाड जमिनीत मिसळून घ्यावे.
२) २०० ग्रॅम नत्र छाटणीनंतर दीड ते दोन महिन्याने/झाड मातीत मिसळून द्यावे.