जांभळ

जांभळ झाडाच्या पानाला असे झाले आहे व पाणी खिडकीझाली आहेत

लीफ मायनर किंवा पानावर पुरळ आणणारी कीड (gall Maker) किडीचे लक्षणे असू शकतात.

लीफ मायनर कीड पानाच्या वरच्या व खालच्या भागाच्या मधोमध पाने खरडून खिडकी तयार करते. पानावरून हात फिरवल्यास पापुद्रा मऊ लागतो.

पुरळ आणणारी कीडीचे लक्षणे असल्यास पानावरून हात फिरवल्यास पाने कडक होतात.

उपाययोजना
१) कीड कमी प्रमाणात नुकसान करते त्यामुळे रासायनिक नियंत्रणाची आवश्यकता नाही.
२) किडीच्या नियंत्रण करिता नुकसानग्रस्त पाने तोडून नष्ठ करावी.
३) पानावर ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
४) किडीच्या नियत्रणकरिता मेटारायझिम अॅनिसोपिली@१०० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.