रब्बी कांदा

कांदा पिक दोन महिन्याचे झाले आहे ठिबक सिंचन वर अर्धा एकरचाा प्लॉट आहे मूळ कुजले सारखी दिसत आहेत रोप मरत आहे फवारणी करावी की पाण्यातून सोडावी

1 Like

ओली मूळ कुज (मररोग) रोगाची लक्षणे वाटत आहे. पाट पाण्याद्वारे ट्रायकोड्रामा व्हीरीडी @२ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून सोडावे.
फवारणीद्वारे बुरशीनाशक दिले गेले तरी पाहिजे तसा परिणाम मिळणार नाही.

रासायनिक बुरशीनाशक पाण्यातून सोडले तर चालेल का

हो चालेल. रासायनिक बुरशीनाशकामध्ये रेडोमिल गोल्ड किंवा साफ बुरशीनाशकचा वापर करावा.