अमृत पाणी कसे तयार करावे

कृपया पद्धत सांगा मला वापरायचे आहे त्याचे फायदे सांगा

4 Likes

अमृतपाणी या विषयीची सर्व माहिती आपणास वॉटर संस्थेचे डॉक्टर आनंद वाणी सर आपणास देऊ शकतात .

अमृत पाणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:-
1)ताजे शेण गाईचे किंवा बैलाचे1किलो (2)गोमूत्र1लिटर (3)बेसनपीठ1किलो (4)गूळ100ग्राम (5)कडुलिंबाचा पाला1किलो (6)पाणी10लिटर
तयार करण्याची पद्धत:-
15 लिटर ची बाटली किंवा टाकीमध्ये वरील साहित्य एकत्र करूनत्याचे मिश्रण10 दिवस झाडाखाली झाकून ठेवावे(2)दररोज सदर मिश्रण सकाळ व संध्याकाळी डावीकडून उजवीकडे काठीने ढवळावे (3)10 दिवसाने सदर मिश्रणफडक्याने गाळून तयार झालेला अर्क फवारणीसाठी 15 लिटर पाण्यामध्ये 150 मिली फवारणी करावी
फायदे:-
(1)सर्व पिकांसाठी उपयुक्त (2)पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त (3)पिकांवरील कीड नियंत्रनासाठी उपयुक्त पिकांवरील चकाकी व उत्पन्न वाढीसाठी उपयुक्त.