नमस्कार सर आज कमी जास्त 15 ते 20 दिवस पूर्ण होत आहेत बहार धरलेला आहे परंतु चौकितुन फुल कळी दिसत नाही कृपया 100% फुल कळी निघण्यासाठी व सेटिंग साठी मार्गदर्शन करा
सेंद्रिय खतात प्रत्येक झाडास 20-25 किलो शेणखत + २ किलो गांडूळ खत + २किलो निंबोळी पेंड या प्रमाणात द्यावी.
रासायनिक खतात २०० किलो नत्र ( ४५० ग्रॅम युरिया)+ ५० ग्रॅम स्फुरद (३२० ग्रॅम ssp) + १५० ग्रॅम पालाश ( २५० ग्रॅम एम ओ पी) या प्रमाणे घेऊन मातीत मिसळून द्यावे. व नंतर हलके पाणी द्यावे.
१)नवीन पालवी आणि फुलकळी अवस्थेत नाप्थलीक असेतिक असिड (NAA)@३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रणाची फवारणी करताना झिंक सल्फेट @३० ग्रॅम + मग्नेज सल्फेट @६० ग्रॅम + बोरीक असिड @२५ ग्रॅम / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) ठिबकद्वारे ०.५२.३४ विद्रयवे खत @५ किलो + अमिनो असिड @१ लिटर/२०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी द्यावे.
४) कीड व रोग व्यवस्थापन करीता वेळोवेळी फार्म प्रीसाईज अॅपचा वापर करावा.
1 Like