अळीचा प्रादुर्भाव जास्त आहे?

सध्या सोयाबीन शेंगांच्या अवस्थेत आहे आळी जास्त दिसत आहे 15 दिवस झाले मागील फवारणी घेऊन इमामेक्टिन बेंजोएट 5 % + क्लोरोपायरीफॉस 20% अमिनो ऍसिड 80% + 13 40 13 अशी फवारणी झाली होती आता कोणती फवारणी घ्यावी.

एकात्मिक कीड नियंत्रण करणे खूप आवश्यक आहे.
शेतात ठीकठिकाणी एकरी @२० पक्षी थांबे उभी करावी.
शक्य असल्यास कामगंध सापळे प्रस्थापिथ करावे.
पाने खाणारी अळीच्या नियंत्रण करिता टाकूमी (फ्लूबेंडामाईड २०%)@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद सर …!

kanda

कांदा पिकास पाणी व्यवस्थापन करावे.
पिकात करपा व पीळ पडल्याची लक्षणे दिसत आहे.

रोग नियंत्रण करिता झायनेब ७८% @४० ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.