डाळिंब छाटणी

डाळिंब छाटणी झाली आहे काय फवारणी करावी

छाटणीनंतर लगेच १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
सरळ आणि मधोमध वाटरशूट वाढलेले काढावेत.
वाळलेल्या फांद्या, पडलेली फळे वेचून नष्ट करावी.

खत व्यवस्थापन
१) शेंद्रीय खतव्यवस्थापन
आधीच्या बहाराची फळे तोडणी झाल्यानंतर, प्रत्येक झाडास २०-२५ किलो शेणखत किंवा
१३-१५ किलो शेणखत + २ किलो गांडूळ खत + २ किलो निंबोळी पेंड किंवा ७.५ किलो
पूर्ण कुजलेले कोंबडीखत + २ किलो निंबोळी पेंड याप्रमाणे खते द्यावीत.

२) रासायनीक खतामध्ये २०५ ग्रॅम नत्र (४४६ ग्रॅम निम कोटेड युरिया प्रती झाड); ५० ग्रॅम
स्फुरद (३१५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रती झाड); १५२ ग्रॅम पालाश (२५४ ग्रॅम म्युरेट
ऑफ पोटॅश किंवा ३०४ ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश प्रती झाड) द्यावे व त्यानंतर हलके पाणी
द्यावे.