मिरची वरील कोकड़ा

मिरची वरील कोकड़ा साठी उपाय सांगा

मिरची च्या शेतात एकरी २०-३० चिकट सापळे लावावे.

रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टीसिलीयम लेकॅनि ७५ मिलि/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणता झाला असेल तर फिप्रोनील ५% ३० मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

या रोगाच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा व्हर्टिसिलियम लेकॅनी 30 ग्रॅम अधिक 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी शेतात पावसाचे पाणी साचलेले असल्यास त्याचा निचरा करावा.
डॉक्टर आनंदा वाणी