जवारी या पिकावर मोठ्या मध्ये कीड दिसून येत आहे त्याच्यावर उपाय सांगा

त्याच्यावर उपाय सांगा

अमेरिकन लष्करी अळी (Fall Armyworm)

ज्वारी मका पिकात बऱ्याच ठिकाणी अमेरिकन लष्करी अळी (Fall Armyworm) या किडीचे प्रादुर्भावाची तीव्रता वाढलेली आहे. याच अवस्थेत नियंत्रण करणे खूप आवश्यक आहे.

लक्षणे:

हि कीड वाढीचे अवस्थेत म्हणजे १०-२५ दिवसाचे असताना अमेरिकन लष्करी अळीचे लक्षणे दिसू लागतात.

बारीक अळ्या समूहाने बाहेर पडून पानावर खरडून खातात पाने निस्तेज करतात. पानावर पांढरी चट्टे पडतात.

मोठ्या अळ्या पानाच्या शिरा पोखरून त्यावर उपजीविका करतात. त्यानंतर पोंग्यात शिरून गोल आकाराचे छिद्र तयार करतात.

पानावर बारीक भुसा सारखा चुरा सुद्धा पाहायला मिळतो. या किडीने ३०-५०% नुकसान होऊ शकते.

नियंत्रण:

  • शेतात पिक उगवणीनंतर १० दिवसांनी पतंग मोठ्या प्रमणात पकडण्यासाठी एकरी @२० कामगंध सापळे प्रस्थापित करावे.
  • शेतात ठिकठिकाणी एकरी@२५ पक्षी थांबे सापळे प्रस्थापित करावे.
  • किडीची अंडी पुंज, समूहातील अळ्या हाताने वेचून नष्ट करावी.
  • विषाणूजन्य किटकनाशक (एस.एल. एन पी.व्ही) ५०० एल. ई. @१५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • किडीने आर्थिक संकेत नुकसानीची पातळी ओलांडल्यास खालीलपैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी.
  • डेलीगेट (स्पिनोटेरम ११.७% एससी.)@३ मिली

अंप्लीगो (क्लोराँट्रानिलिप्रोल ९.३% + लॅम्बडा-सायहॅलोथ्रिन ४.६% झेड.सी.)@५ मिली

कोराजन (क्लोराँट्रानिलिप्रोल१८.५% एससी.)@३ मिली

एव्हीसिन्ट (मॅमेक्टिन बेंझोएट 5% + लुफेन्युरॉन 40% WG)@५ ग्रॅम

वरील सर्व मात्रा १० लि. पाणीसाठी देण्यात आलेली आहे.