सोयाबीन

सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत

ग्रीन मोटल व्हायरसची लक्षणे आहेत. या रोगाचा प्रसार पांढरीमाशी (रसशोषक) किडींमार्फत होतो.

उपाययोजना
१) जर रोगाची तीव्रता १०% पेक्षा जास्त असेल तर नियंत्रण मिळवणे कठीण आहे किंवा कीड/ रोगावर अपेक्षित परिणाम मिळवणे काठीन आहे.
२) प्रादुर्भावग्रस्त झाडे काढून नष्ट करावे.
३) नवीन सोयबीन पेरणी करत असल्यास शेताच्या कडेला मका/ज्वारीची लागवड करावी.
४) शेतात ठीकठिकाणी निळे चिकट सापळे @२०/एकरी प्रस्थापीठ करावे.
५ ) पांढरीमाशी नियंत्रण करिता उलाला @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उलला,निंबोळी तेल,फेरस12%,एममेकटींन अशी फवारणी केली पण पिवळेपणा थांबत नाही

प्रादुर्भावग्रस्त रोपे दुरुस्त होण्यास वेळ लागेल, नवीन रोपांवर लक्षणे कमी होऊ शकतात.
उपायोजना मध्ये पहिल्याच ओळीत सांगितलेलं आहे कि नियंत्रण करणे कठीण आहे.