आंब्याच्या खोडाला कीड लागली आहे

आंब्याच्या खोडाला कीड लागलेली आहे त्यावर काय उपाय करावे… आत मध्ये आळी असेल असे वाटते आत मधील भुसा बाहेर खाली पडलेला आहे.उपाय सांगा

खोड किडीची लक्षणे आहेत.

उपाययोजना
१) वाळलेल्या फांद्या काढून नष्ट कराव्यात.
२) बागेतील खोड किडीचे भुंगेरे मोठ्या- प्रमाणात पकडण्यासाठी @१ प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
३) लक्षणे दिसत असलेया झाडांच्या खोडामध्ये सरळ लांब तार टाकून फिरवावे त्यामुळे किडीची अळी अवस्था मरतील.
४) इंजेक्शन मध्ये १० मिली डेसीस घेऊन खोडात टाकावे व बाहेरून चिखलाच्या सहायाने खोड बंद करावीत.
५) क्लोरोपायरीफॉस १० मिली इंजेक्शन मध्ये घेऊन वरीलप्रमाणे बंद करावे.