मावा किडीचे लक्षणे आहेत सोबत फुलकिडीची सुद्धा लक्षणे दिसत आहे.
एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
१) शेतात एकरी @४० निळे- पिवळे चिकट सापळे पप्रस्थापित करावे.
२) बिव्हेरिया बॅसियाना@५०० ग्रॅम + **व्हर्टिसिलियम लेकॅनी @ ५०० ग्रॅम /२०० लिटर पाण्यात मिसळून आवळणी घालावी.
३) बिव्हेरिया बॅसियाना@५० ग्रॅम + **व्हर्टिसिलियम लेकॅनी @५० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) मिरची लागवडीपूर्वी चारही बाजूने सापळा पीक म्हणून मका/ज्वारीची लागवड करावी.
५) मावा किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता फ्लोनिकामाईड ५०% डब्लूजी @१० ग्रॅम /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.