मोसंबी बहार

मोसंबी आंबे बहार खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन मार्गदर्शन करावे

ताण सुरू केल्यानंतर पानांचा मूळचा रंग कमी होऊन ती फिक्कट व नंतर पिवळी पडतात. असे होत असतांना पाने गळून पडे पर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात. साधारणपणे 25 टक्के पानगळ झाल्यास ताण बसला असे समजावे.

उपाययोजना
१) डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ताणावर सोडल्यानंतर त्वरीत प्रत्येक झाडाला 40 ते 50 किलो शेणखत टाकून आडवी आणि उभी वखरण करावी.
२) नंतर हलके ओलित करावे.
३) झाडांना कमीत कमी ३५ ते ४० दिवस बसने आवश्यक आहे.
४) ताण तोडतांना हलक्‍या ओलिता अगोदर प्रत्येक झाडाला 600 ग्रॅम नत्र + 400 ग्रॅम स्फुरद + 400 पालाश आणि भरखते द्यावीत.
५) त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी (चिंबवणी) द्यावे. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे.
६) ताण सोडल्यावर 20 ते 25 दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (युरिया) (अर्धा) हप्ता एक ते दीड महिन्याने किंवा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावा.
७) हलक्‍या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते.

८) झाडांना नवीन पालवी आल्यास फवारणी व्यवस्थापन करावे.

झाडांना हलके पाणी देण्यापूर्वी ०.५२.३४ @१०० ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये @३० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.