मर रोग/ मूळकुज रोगावर एकच रामबाण उपाय आहे ते म्हणजे निवडलेले द्रावण (बुरशीनाशक) हे रोपांच्या मुळापर्यंत पोहचले पाहिजे अन्यथा रोग नियंत्रण करणे कठीण जाते.
उपाययोजना
मर रोग/ मूळकुज रोग नियंत्रण करिता मेटॅलॅक्सिल 4% + मॅन्कोझेब 64% (रेडोमिल गोल्ड)@४० ग्रॅम किंवा (रोको)@ ४० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फवारणी करताना पंपाचे नोझल ढिले करावे जेणेकरून द्रावण खोडावरून पसरत मुळा पर्यंत पोहोचेल.