मकातील आळी

मका पिकामध्ये या आळीचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्या परिस्थितीत कोनती फवारणी करावी

1 Like

नुकसान जास्त प्रमाणात दिसत आहे.

उपाययोजना
१) दाणेदार स्वरूपातील किटकनाशक जसे कि कार्बोफुरोन@१० किलो/एकर या प्रमाणे घेऊन पिकाच्या पोंगा मध्ये टाकावे.
२ ) क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपर मेथ्रीन ५ % EC (हमला, डबल स्टार ,कोरंडा ५०५ )@३० मिली
३ ) क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली
४) इमामेक्टीन बेनझोइट ५ %SG (स्टारक्लेम, प्रोक्लेम, मिसाईल )@५ ग्रॅम + क्लोरोपायरीफॉस २० % EC @३० मिली. किंवा डेलीगेट (स्पिनेटोरम 11.7% SC)@५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

डेलिगेट 10मि ली15 लिटर पाण्यात मिसळून पोगात टाकले

प्रादुर्भाव कमी झाला असेल काही प्रमाणात.

काही प्रमाणात कमी झाला आहे

पिकाच्या प्राथमिक अवस्थेत जर पिकात कामगंध सापळे प्रस्थापीथ केल्यास होणारे नुकसान टाळता येते.

सुरुवातीपासूनच लष्करी अळीचे लूर वापरलेले कामगंध सापळे वापरावे