तूर वाळत आहे. मुळाला पांढरी बुरशी आहे.वाळण्याचे कारण काय व उपाय काय.
तुमच्या सांगण्यानुसार मूळकुज रोगाची लक्षणे वाटत आहे. सोबत मर रोगाची लक्षणे असू शकतात.
पीक फुलोरा ते शेंगा भरणी अवस्थेत असल्यास या रोगाची लक्षणे दिसतात व हळू हळू या रोगाचा झपाट्याने प्रसार होतो.
याअवस्थेत रोगावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते.
उपाययोजना
१) मूळकुज/ मररोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी.
२) बाविस्टीन @४० ग्रॅम/२० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी.
३) पाट पद्धतीने पाणी दिल्यास रोगाचा प्रसार झपाट्याने होते त्या करिता वरील व्यवस्थापन करावे.