आंबा

केशर आंबा पिकाची रोपे जळत आहेत, मार्गदर्शन करावे.

आंबा पिकाची रोप पूर्णपणे वाळून गेलेले आहे. वाळवी, मर रोग किंवा खोडकीडीचे लक्षणे असू शकतात.
आता नियंत्रण मिळवणे कठीण आहे.

इतर रोपांसाठी उपाययोजना
१) ट्रायकोड्रामा/ सुडोमोनास @१०० ग्रॅम + १ लिटर पाणी/ झाड मिसळून आवळणी करावी.
२) वरील नियोजन केल्यानंतर खोडकीड व वाळवी नियंत्रण करिता क्लोरोपायरीफॉस ३०% @४०मिली/झाड याप्रमाणे घेऊन आवळणी करावी.
३) रोपमधील वाळलेल्या फांद्या कापून नष्ठ कराव्यात.