हरभरा पेरणी करून जवळपास 13 दिवस झालेले आहे काही ठिकाणी हरभरा सुकत आहे याला काय कारण असू शकते आणि यावर काय उपाय करावा
या वर्षी पाऊस जास्त झाल्याने जमिनीत जास्त दिवस पाणी साचून राहिल्यास किंवा वापसा न आल्यास हरभरा पिकात मर रोग व कॉलर रॉट (मूळ कुज) रोगाची लक्षणे दिसू शकतात.
हरभरा पिकाची रोपे अवस्था व फुलोरा अवस्थेत मर रोग व मूळ कुज रोगाची लक्षणे दिसतात.
नियंत्रण करिता रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम किंवा विटावॅक्स पाॅवर @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून
नुकसान झालेल्या ठिकाणी आवळणी करावी.
५-६ दिवसाच्या नंतर ट्रायकोड्रामा + सुडोमोनास @२ किलो +@४ किलो गुळ २०० लिटर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आवळणी करावी.
The above questions have been answered to you when you was asked individual.