हरबरा सुकु राहीला

हरभरा पेरून दहा दिवस झाले हरभरा सुकू राहिला बुरशी आहे की करंडा.

कातरकीड किंवा मूळ कुज रोगाची लक्षणे असू शकतात.

कातरकीड रोपे बुडापासून कुरतुडून उपजीविका करतात. तशी लक्षणे असल्यास रोपांच्या बुडाला संध्याकाळी क्लोरोपायरीफॉस २०% @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या बुडाला आळवणी घालावी.

या वर्षी पाऊस जास्त झाल्याने जमिनीत जास्त दिवस पाणी साचून राहिल्यास किंवा वापसा न आल्यास हरभरा पिकात मर रोग व कॉलर रॉट (मूळ कुज) रोगाची लक्षणे दिसू शकतात.

हरभरा पिकाची रोपे अवस्था व फुलोरा अवस्थेत मर रोग व मूळ कुज रोगाची लक्षणे दिसतात.

नियंत्रण करिता रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम किंवा विटावॅक्स पाॅवर @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून
नुकसान झालेल्या ठिकाणी आवळणी करावी.
५-६ दिवसाच्या नंतर ट्रायकोड्रामा + सुडोमोनास @२ किलो +@४ किलो गुळ २०० लिटर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आवळणी करावी.