हरभरा पेरणी करून आठ दिवस झाले नेमकीच उगू राहिलं
पण त्याला काय कतरू राहिलं उपाय सांगा
कटवर्म किंवा गोगलगायची लक्षणे असू शकतात.
गोगलगाय नियंत्रणाचे उपाय
१ ) शेतात ठरावीक अंतरावर उचलता येण्यासारखे गवताचे ढीग किंवा गोणपाट गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी अंथरावेत. त्यावर गोगलगायी आकर्षित होतात. सकाळी सूर्योदयानंतर पोत्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी जमा करून नष्ट कराव्यात.
२) संध्याकाळी व सूर्योदयापूर्वी बाहेर आलेल्या तसेच दिवसा झाडावर लपलेल्या गोगलगायी हाताने गोळा करून साबणाच्या द्रावणात बुडवाव्यात. त्यानंतर जमिनीत खड्ड्यात पुरून टाकाव्यात किंवा रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात.
३) गोगलगायींचे वास्तव्य मुख्यत: बांधावरील गवतावर असल्याने शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत.
पालापाचोळा, तण काढून शेत नेहमी स्वच्छ ठेवावे.
४)लहान शंखी गोगलगायी मिठाची फवारणी किंवा कॅल्शिअम क्लोराइडचाही बऱ्याच ठिकाणी वापर केला जातो.
-मेटाल्डिहाइड ५ टक्के पावडरची पिकावर धुरळणी करावी.
कटवर्म (कातरकीड)
संध्याकाळच्या वेळी रोपांची मुळे बुडापासून कट करतात. बारकाईने निरीक्षण केल्यास कट केलेल्या रोपांभोवती कीड लपलेली असेल.
नियंत्रणाचे उपाय
कार्बोफुरोन एकरी @१० किलो शेणखतात मिश्रण करून शेतात प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी फेकून द्यावे.