पेरणी पुर्व नियोजन ते बीज प्रक्रिया

हरभरा पेरणी पुर्व नियोजन ते बीज प्रक्रिया विषयी सविस्तर माहिती सांगवी.

1 Like

हरभरा कोरडवाहू व पाण्याखाली पेरणीसाठी विजय, दिग्विजय या जाती शिफारस केलेली आहे. तसेच केवळ ओलीतीखाली पेरणीसाठी विराट, जॅकी हे वाण शिफारशीत आहे.
पेरणीसाठी एकरी @२५ ते ३० किलो बियाणे वापरावे.
ज्या शेतात पावसाळ्यात पाणी साचलेले असल्यास त्या शेतात मर रोगाची लक्षणे दिसू शकतात. मर रोगांमुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून @३ किलो ट्रायकोड्रामा व्हीरीडी + चांगले कुजलेले शेणखत @१० किलो/एकरी पेरणीपूर्वी शेतात मिश्रण करून द्यावे.

बीजप्रक्रिया
थायरम @३ ग्रॅम + रायझोबीयम @२५ ग्रॅम/किलो बियाणे याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन
हरभरा पिकास २५:५०:२५ (नत्र:स्फुरद: पालाश शिफारस आहे.