मोसंबी खोड किड

सर माझ्या मोसंबी खोडावर डिग व आसे खोड होऊन वरची बाजू वाळत आहे उपाय सांगा

1 Like

डिंक्या रोगाची लक्षणे आहेत. खोडावर डिंक आलेले दिसतात.
नियंत्रण करिता झाडाच्या खोडावर २ ते ३ फुटापर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्याकरिता १ किलो मोरचूद ५ लिटर पाण्यात व १ किलो चुना ५ लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी दोन्ही मिश्रण एकत्रित करून पेस्ट करावी व टी पेस्ट खोडावर लावावी.
किंवा सायमोक्सॅनिल 8%+ मॅन्कोझेब 64% WP (कृझेट)@१८० ग्रॅम/१०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.