सध्या बऱ्याच ठिकाणी कापूस पिकावर दहिया रोगाचे, पांढरी माशी व फुलकिडे या रशशोषक किडीचे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यामुळे कापूस पिकाची पाने भुरकट व गंज लागल्यासारखी दिसतात व काही ठिकाणी दहिया रोगामुळे पाने करपतात. दुसरे प्रमुख कारण म्हणजे जर कापूस पिकात कैर्यांची संख्या ४० -५० पर्यंत झाल्यास पाने कडक होतात. त्यावेळी पिक पानांमधील अन्नद्रव्ये बोंड वाढीसाठी व भरणीसाठी उपयोगी करतात.
रोग व कीड व्यवस्थापन
१) पांढरी माशी व फुलकिडे नियंत्रण करीता पायरिप्रॉक्सीफेन 10% EC**(लॅनो)**@२० मिली किंवा पायरिप्रॉक्सीफेन ०५% + डायफेंथियुरॉन २५% एसई (SLR-५२५)@२५ मिली सोबत हेक्झाकोनॅझोल ५% @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
खत व्यवस्थापन
बोंड भरणी अवस्थेत कापूस पिकास अन्नद्रव्याची गरज भासते.
१)सध्या २% डीएपी (२०० ग्रॅम/१० लिटर पाण्यासाठी) + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२०ग्रॅम किंवा १३:४०:१३ @७० ग्रॅम + इसबिओन @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) शक्य असल्यास मॅग्नेशियम @१० किलो + १०:२६:२६ @३० किलो/एकर या प्रमाणात घेऊन पेरणी करावी.
सर घटक व औषधी चे एक दोन नावे सांगा कारन कधी कधी दुकानदाराला सुद्धा समजत नाही
घटक व व्यापारी नावासहित माहिती देण्यात आलेली आहे.