कापुस पाते गळ

माझ्या कपाशीला तीस ते चाळीस बोंडे पक्के झाले 30 ते 40 बोंडे पक्के झाले पण कपाशीचा हीरवा पना कवळकी कमी झाली व पाते गळ पण त्यासाठी कपासीला हिरवा पना कवळकी साठी काय करावे

मागील काही दिवसापासून कापूस पिकावर फुलकिडे रसशोषक किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पिकाची पातेगळ पानामध्ये कडकपणा व हिरवे पण कमी होतो. तसेच बोंडाची संख्या ४० पेक्षा जास्त असेल तर पिक पानातील अन्नद्रव्ये बोंड वाढीसाठी वापरतात त्यामुळे पाने पिवळी पडतात.

उपाययोजना
१) फुलकिडे व पांढरी माशी रशशोषक कीड नियंत्रणासाठी फिप्रोनील ५% एससी (महावीर, युनिप्रो, रीजेंट) @५० मिली किंवा फिप्रोनील ८०% डब्लूजी (जंप)@५ ग्रॅम सोबत इसबिओन @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) फवारणीद्वारे अन्नद्रव्ये व्यवस्थापनात मिक्सोल/चील्मिक्स कॉम्बी (सूक्ष्म अन्न द्रव्ये) @३० ग्रॅम + २०० ग्रॅम डीएपी/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) कापूस कमी दाटलेलं असेल व वापसा असल्यास खत व्यवस्थापनात एकरी एक २५ किलो मॅग्नेशियम + ४० किलो डीएपी मातीत मिसळून द्यावे.
४) एकूण १० पाते संख्यातून केवळ ३-४ पाते झाडावर टिकून राहतात उर्वरित गळून पडतात.
गळून पडण्याचे कारण कमी सूर्य- प्रकाश, झाडामध्ये अन्नद्र्व्यासाठी निर्माण झालेली स्पर्धा पातेच्या ठिकाणी तयार झालेली अब्सेसीक थर अशी बरीच कारणे कारणीभूत ठरतात पातेगळ साठी.
जास्त प्रमाणात पातेगळ होत बोरॉन @२० ग्रॅम+ प्लॅनोफ़िक्ष (NAA)@ ४ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
महिन्यातून २-३ वेळा वरील प्रमाणे नियोजन करावे.