नारळाची फळे बोराच्या आकाराची किंवा त्यापेक्षा मोठी असताना गळून पडतात व यामुळे नारळ उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात घट होते. नारळाच्या झाडांचे योग्य वेळी योग्य व्यवस्थापन केल्यास या समस्येतून मार्ग काढता येतो. नारळ फळगळीची प्रमुख कारणे - • वातावरणामध्ये झालेले अचानक बदल. • परागीकरण व्यवस्थित न होणे अशी बरीच कारणे फळगळती साठी कारणीभूत ठरतात.
उपाययोजना
शिफारस केलेली खते वर्षातून दोन वेळा जून -जुलै व नोव्हे - डिसें मध्ये विभागून द्यावीत. • तसेच वर्षातून एकदा सुक्ष्म अन्नद्रव्य फेरस सल्फेट ,झींक सल्फेट , मॅग्नेशीयम सल्फेट , मॅगेंनिज सल्फेट, बोरॅक्स शेणखतासोबत द्यावीत. • वर्षातून दोन वेळा जीवाणू खते अझाटोबॅक्टर ,पी एस बी 2 किलो/ एकर किंवा 50 ग्रॅम /झाड प्रमाणे शेणखतासोबत द्यावे
धन्यवाद