कोणती अळी आहे

किटकनाशक सांगा

1 Like

तंबाखू वरील पाने खाणारी अळीचे बारीक पुंजके आहेत. या पुंज्क्यातून बारीक अळ्या बाहेर पडून पाने खरडून खातात.

नियंत्रणाचे उपाय
१) किडीने पुंजक्यात घातलेली अंडीसहित पाने जमा करून नष्ट करावी.
२)शेतात एकरी एक प्रकाश सापळ्यांचा वापर करावा तसेच कामगंध सापळे @२०/एकरी लावण्याची सोय करावी.
जर किडीच्या संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (१० % नुकसान )असेल तर खालील कोणत्याही एका कीटकनाशक ची फवारणी करावी.
१ ) क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपर मेथ्रीन ५ % EC (हमला, डबल स्टार ,कोरंडा ५०५ )@२० मिली
२ ) क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली
३) इमामेक्टीन बेनझोइट ५ %SG (स्टारक्लेम, प्रोक्लेम, मिसाईल )@५ ग्रॅम + क्लोरोपायरीफॉस २० % EC @३० मिली. किंवा डेलीगेट (स्पिनेटोरम 11.7% SC)@३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.