सोयबीन पिवळा मोसैक रोगाची लक्षणे आहेत या रोगाचा प्रसार पांढरी माशी माफर्त होतो.
१) पिवळा मोसैकग्रस्त झाडे कमी असतील तर रोगग्रस्त झाडे काढून नष्ठ करावी त्यामुळे निरोगी झाडावर विषाणू चा प्रसार होणार.
२) पांढरी माशी नियंत्रणासाठी व निरीक्षण करिता एकरी @२० पिवळे चिकट सापळे लावावे.
३) पांढरी माशी नियंत्रण करिता खालीलप्रमाणे नियोजन करावे.
अ) स्पायरोमेंसिफेन २२.९ %EC (ओबेरॉन )@१० मिली , किंवा
ब) डायफ़ेथुरॉन ५० % WP (पोलो, पेगासस )@२० ग्रॅम, किंवा
क) इमिडाक्लोप्राईड १७.८ % SL(टाटा माणिक , कॉन्फिडर )@७ मिली किंवा
ड )असाटामाप्राईड २० % SP (शार्प , प्राईड, इनोव्हा )@५ ग्रॅम /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तसेच उंटअळी किडीने जर आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर वरीलपैकी एका किटकनाशक सोबत इमामेक्टीन बेन्झोंएट ५% (मिसाईल, प्रोक्लेम)१० ग्रॅम/ १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.