वरील झाड खाणारी अळी आहे त्या वरती शेंद्रिय उपाय कोणता?

वरील झाड खाणारी अळी आहे त्या वरती शेंद्रिय उपाय कोणता?
आम्ही यावरती काही ठिकाणी रासायनिक फवारणी केली आहे.

1 Like

Bihar hairy caterpillar ( केसाळ अळी) आहे.
हि एक तुरळक ठिकाणी आढळणारी कीड आहे. या अळीचा प्रादुर्भाव शेतात एक दोन ठिकानीच आढळून येतो.
झाडावर कीड समूहाने आढळतात त्यामुळे पाने जाळीदार होतात.

नियंत्रणाचे उपाय
अळीग्रस्त झाडे काढून नष्ट करा.
शेतात पक्षी थांबे उभी करा.
जैविक कीड नियंत्रणात मेटारायझिम अॅनिसोपिली@५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.