फुलगळ होऊ नये म्हणून व फुलांची संख्या वाढावी म्हणून १३.४०.१३ विद्राव्ये खत @५० ग्रॅम + प्लानोफ़िक्ष (NAA) @३ मिली + अमिनो अॅसिड @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मिरची वरील फुलकिडे या रसशोषक किड, नियंत्रणासाठी फिप्रोनील ५ % SC @३० मिली + बायो ३०३ @२० मिली किंवा डेलीगेट @५ मिली/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.