वांग्या वरील रोग

वांगे सध्या फळावर आहेत , शेंडा अश्या प्रकारे कोमजतोय ( कोकडा सदृश्य )

लिटल leaf ऑफ ब्रिंजल (बारीक पाने तयार होणे) या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे.

व्यवस्थापन
१) प्रादुर्भाव ग्रस्त झाडे काढून नष्ट करावी त्यामुळे निरोगी झाडांवर प्रसार होणार नाही.
२)रोगाचा प्रसार तुडतूडे (Jassid) या रस शोषक कीड मार्फत होतो.
३) तुडतूडे एकात्मिक व्यवस्थापन करिता शेतात एकरी @५० चिकट सापळे प्रस्थापित करावे.
४) प्रभावी नियंत्रण करिता असिफेट ७५% एसपी (असटॉफ)@३० ग्रम + स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.