अति पावसाने किंवा पिकात पाणी साचून राहत असल्याने कॉलर रॉट व अनद्र्व्ये उपलब्ध न होणे या कारणाने सोयबीन पीक सध्या पिवळे पडत आहे व कोमजून जात आहे.
उपाययोजना
१) शेतात अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. शक्य असल्यास हलकी कोळपनी करावी त्यामुळे वापसा होण्यास मदत होईल.
२) अंतरप्रवाही बुरशीनाशक जसे कि हेक्झाकोनॅझोल ५% ईसी @३० मिली + बायोस्टीमुलानट @३० मिली + १९:१९:१९ विद्राव्य खत @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास प्रादुर्भावाची तीव्रता कमी करता येईल.
३) डीएपी @२०० ग्रॅम + हेक्झाकोनॅझोल ५% ईसी @३० मिली + ह्युमिक असिड @५० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी. (आठवड्यातून दोनवेळा केल्यास परिणाम छान मिळतील)
कोनती बुरशी आहे सर आणि भविष्यात कोणती परिणाम दिसून येईल . थोडं सांगावे
जर पिकाच्या खोडाला पांढरी बुरशी वाढलेली असेल तर कॉलर रॉट रोगाची लक्षणे आहेत. वरीलप्रमाणे नियोजन करावे.
एवढ्या तपरतेने आपण ही माहिती देऊन खूप मोठी मदत केली. खूप खूप धन्यवाद सर …