सोयाबीन

सर 20 जुलै ला kds726 हा वान पेरला आहे पानी लागले आहे सोयाबीन पिवळे पडते आहे उपाय सुचवावा

ज्या ठिकाणी पाणी लागून पिवळी पडत असेल त्या ठिकाणी पिकांना डीएपी @१०० ग्रॅम + कार्बेन्डेझिम ५०% डब्लूपी @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून पंपाचा नोझल काढून आळवणी (ड्रेंचींग) घालावी.

आळवणी (ड्रेंचींग) करताना अडचण निर्माण होत असेल तर १९:१९:१९ @ ५० ग्रॅम + ह्युमिक असिड @ ३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.