कापूस

कापूस लागवड करून चाळीस दिवस झाले आहे तरी पण झाडाची वाढ होत नाही 80 आर लागवड पैकी 10 आर कापसाची वाढ कमी होत आहे तरी कपाशीची वाढ होण्याकरता उपाय सांगा पहिल्या शिफारस नुसार फवारणी केली आहे तरी पन म्हना तसी वाढ होत नाही

तुडतुडे किडीची लक्षणे दिसत आहे व तसेच चुनखडीची जमीन असल्याने कोणत्याही पिकाची वाढ संथ गतीने होत असते.

कीड नियंत्रण
तुडतुडे रसशोषक किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे.
नियंत्रण करिता फ्लोनिकामाईड ५०% डब्लूजी (उलाला)@५ ग्रॅम + अमिनो अॅसिड (अम्बिषण, इसबिओन)@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पिकाच्या वाढीसाठी १९:१९:१९ @५ किलो + ह्युमिक अॅसिड @१ किलो/२०० लिटर पाण्यात निसळून एक एकर क्षेत्रासाठी द्यावे.

भर खतात डीएपी @५० किलो+ युरिया @१५ किलो + सूक्ष्मअन्नद्रव्ये @१० किलो/एकर याप्रमाणे मातीत मिसळून द्यावे.