टोमॅटो च्या पानावर व फळावर ठिपके येत आहेत

पानावर काळे ठिपके आणि करपा येऊन पाने वळतात काय करावं

टोमॅटो पिकावरील जिवाणूजन्य रोग

टोमॅटो पिकावर तीन वेगवगळे जीवाणूजन्य रोग येत असतात

  1. बॅक्टेरियल कॅनकर (Calvibacter michiganesis)

  2. बॅक्टेरियल स्पीक (Psedomonas syringae)

  3. बॅक्टरियल स्पॉट (Xanthomonas euvesicatoria)

एकदा या रोगाचा शिरकाव झाल्यास नियंत्रण करणे कठीण जाते.
सतत पाऊस व हवेतील आद्रता रोग वाढीस कारणीभूत आहे.

नियंत्रणाचे उपाय:
एकदा या रोगाचे शिरकाव झाल्यास नियंत्रण मिळवणे कठीण जाते.
प्रादुर्भावग्रस्त रोपे फांद्या फळे काढून नष्ठ करावी त्यामुळे निरोगी रोपावरती प्रसार होणार नाही.
टोमॅटो पिकावर बॅक्टेरीयल रोग येऊ नये म्हणून दर आठवड्यातून एकदा + कॉपर युक्त बुरशीनाशकाची फवारणी आलटून पालटून घेत राहावी.
ब्लू कॉपर /कोसाईड / कुप्रोफिक्स / कोनिका
किंवा
 जैविक बुरशीनाशकांमध्ये
• बॅसिलस + सुडोमोनास + ट्रायकोडर्मा + अशी फवारणी दर आठवड्यातून एकदा घेत राहावी.
रोग आलेला असेल तर
• फळावर डाग आलेले असतील तर सुरुवातीला सर्व डाग आलेले फळे काढून बाहेर टाकावे व त्यानंतर खालील फवारण्या 6-7 दिवसाच्या अंतराने वातावरण बघुन आलटून पालटून घ्याव्यात.

  1. ब्लू कॉपर @ 500 ग्रॅम /कोसाईड @ 250 ग्रॅम + व्हॅलीन @ 250 मिली/200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  2. स्कोर 100 मिली + /कवच @ 400 ग्रॅम + 0.52.34 @ 500 ग्रॅम /200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.