पाने खालेली दिसतात पण आळी किंवा अन्य ईतर कीटक दिसत नाही

सोयाबीन पिकाला 23दिवस झाले आहे आणि आता पाने खालेली दिसत आहे पण कुठली आळी किंवा ईतर कुठल्याही प्रकारचे कीटक दिसत नाही तरी योग्य उपाय सांगा

पैसा/ वाणी या किडीचे लक्षणे आहेत. केवळ रोपे अवस्थेतच या किडीचे प्रादुर्भाव दिसून येते.
पावसाचे प्रमाण वाढल्यास या किडीमुळे होणारे नुकसान कमी होते.

आवश्यकता असल्यास कार्बोफुरोन ३% दाणेदार किंवा फिप्रोनील ०.३% दाणेदार @५ किलो+१०० किलो चांगले कुजलेले शेणखत/एकर याप्रमाणे घेऊन ओळीने वाणी/ पैसा किडीचे उपद्र्व्ये होणाऱ्या ठिकाणी मातीत मिसळून द्यावे.