कापूस

कोणती फवारणी घ्यावी

मावा व तुडतुडे किडीसाठी शेतात एकरी @२० पिवळे चिकट सापळे प्रस्थापीथ करावे.
जर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ( २ तुडतुडे व ५ मावा/पान) ओलांडली असेल तर खालीलप्रमाणे नियोजन करावे.

पहिली फवारणीमध्ये इमिडाक्लोप्रीड १७. ८% एस एल ( टाटा मिडा, कॉन्फिडर) हे कीटकनाशक वापरणे टाळावे. इतर पर्यायी किटकनाशकाचा वापर करावा.

मावा व तुडतुडे किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता डायमीथोएट ३०% ईसी (रोगर, टाफगोर) @ २० मिली किंवा थायमेंथोक्झाम २५% @५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.