पाउस

या वेळी पाऊस कसा आहे . माहिती

या वर्षी पाऊस समाधानकारक असेल असे स्कायमेट व भारतीय हवामान विभागचं म्हणन आहे. ९८% पाऊस पडेल अस दोन्ही विभागाच म्हणन आहे.

1 Like

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरूवारी (ता. १४) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावत होण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात ला-निना स्थिती कायम राहणार असून, शेवटच्या टप्प्यात ला-निना स्थिती सर्वसाधारण पातळीवर येण्याचे होण्याचे संकेत आहेत.
नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी मॉन्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हवामान विभागाने १९७१ ते २०२० कालावधीतील सुधारीत दीर्घकालीन सरासरी जाहीर केली आहे. त्यानुसार देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८७ सेंटिमीटर म्हणजेच ८६८.६ मिलिमीटर आहे. तर, सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.
यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४० टक्के), तर दुष्काळाची शक्यता १४ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीपेक्षा ९९ टक्के (उणे १ टक्का) पाऊस पडला होता.

#स्त्रोत: अग्रोवन.

1 Like

सुरवात केव्हा होईल पाऊस

मराठवाडा मानसुन सुरवात